हीलस्टेशन फाउंडेशन
पुण्यातील एक सामाजिक संस्था आहे जी बिहारच्या भारत-नेपाळ सीमेवरील जंगलात
आदिवासी (थारू) भागामध्ये काम करते. संस्था ग्राम सक्षमीकरणासाठी एका
वेळी एक पंचायत दत्तक घेऊन, तिथे शिक्षण, पाणी, स्वच्छता, अन्न सुरक्षा,
शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि महिलांचे सबलीकरण या विविध पैलूंवरती
प्रकल्प करतो. सध्या कॉम्प्युटर प्रशिक्षण , शिलाई प्रशिक्षण, मानसिक
स्वास्थ्य, मासिक पाळी जनजागृती, अन्नदान, अनिमियामुक्त पंचायत असे अनेक
छोटे- मोठे उपक्रम संस्था "परसोनि, रामनगर, पश्चिम चंपारण, बिहार" मध्ये
राबवत आहे.
इथे
आसपास जवळ-जवळ २०० किलोमीटर च्या परिसरात एकही मानसोपचार केंद्र नाही.
शिक्षणाच्या अभावापायी बऱ्याचदा अंधश्रद्धा, भूतबाधा या नावाखाली, मानसिक
रुग्ण शारीरिक किंवा मानसिक हिंसेचे बळी होतात. त्यांना समाजात स्वीकारणं
दूर, पण कुटुंबामधेही शारीरिक-रुग्णांच्या च्या तुलनेत त्यांची कमी काळजी
घेतली जाते. उपचार केले जात नाहीत. "शिफा - ग्रामीण मानसिक स्वास्थ" हा
अशाच मानसिक रुग्णांसाठी सुरु केलेला प्रकल्प आहे. शिफा या प्रकल्पामध्ये
गावामधील तरुण मुलामुलींना मानसिक सर्वेक्षण करण्याचं प्रशिक्षण देऊन,
घरोघरी जाऊन मानसिक रुग्ण शोधले जातात, त्यानंतर डॉक्टर अश्या रुग्णांना
तपासून औषध किंवा थेरपी चा सल्ला देतातं. स्किझोफ्रेनिया, बायपोलर
डिसऑर्डर, एपिलेप्सी, डिप्रेशन, एन्गझायटी, ओसीडी या सर्व रुग्णांना मोफत
औषधं व थेरपी दिली जाते. रुग्णाच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना त्या रोगाची
माहिती देऊन काळजी घ्यायला शिकवण, हा या अत्यंत प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग
आहे. गावातील प्रशिक्षित मानसिक रोग्य कार्यकर्ते, वेळोवेळी अश्या
रुग्णांच्या घरी जाऊन, दिलेली औषधं वेळेत घेणे, औषंधाचें साईड इफेक्ट,
मानसिक आजार हा खरा आजार आहे हे मनावर बिंबवत राहतात. डॉक्टरसुद्धा २
महिन्यांनी औषधांचा डोस कमी-जास्त करतात. मानसिक आजाराचे उपचार प्रदीर्घ
कालावधी साठी करावे लागतात. सगळ्यांच्या एकत्रित मेहनतीनंतर रोग्यांमध्ये
हळू हळू तीन ते चार महिन्यांमध्ये सुधार दिसू लागताच, संस्था त्यांना
समाजात स्थान मिळवून देण्यासाठी सबलीकरणाकडे लक्ष देते.
हा
प्रकल्प भारताच्या प्रत्येक खेडेगावात करण्याचं स्वप्न खूप मोठं असलं तरी
अशक्य नक्कीच नाहीये. आपला आशिर्वाद आणि आधार ह्या दोन्ही गोष्टी या
स्वप्नपूर्ती साठी लाख मोलाच्या आहेत .
मदत किंवा माहितीसाठी संपर्क -
स्नेहल जोशी / डॉ. गौरव कुमार
फोन - 7970994279
ईमेल - hello@healstatinfoundation.org
www.healstationfoundation.org
No comments:
Post a Comment